चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीसाठी अमित शहा मैदानात

उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह 40 प्रचारक

0

तिष्ठेची होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने याकडे गांभीर्याने पाहत मोठी यंत्रणा कामाला लावल्याचे चित्र दिसत आहे. या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांनादेखील उपस्थित राहणार आहेत.

अमित शहा 18 आणि 19 फेब्रुवारीला पुण्यात आहेत. 18 तारखेला अमित शाहांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर 19 तारखेला अमित शाह हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी महत्वाची आहे. या पोटनिवडणुकीकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात अमित शहा पुण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवाय कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी जगतापदेखील उपस्थित राहणार आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा हा दौरा आखण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, भगवत कराड, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, गोपीचंद पडळकर यांच्यासह 40 जण प्रचाराला उतरवले आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.