अमित शहा यांच्या भाजप नेत्यांसह चर्चा; आगामी निवडणुका लक्ष

0

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुका तसेच, लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीसाठी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत येताच अमित शहा यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सह्याद्री अतिथीगृहावर भाजप नेत्यांची बैठक घेतली.

बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत अमित शहा यांनी मुंबईतील भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतली.

सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भाजपच्या मुंबई कोअर कमिटीच्या दोन सविस्तर बैठका घेऊन आढावा घेतला व मार्गदर्शन केले, अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज वितरित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला अमित शहा हजेरी लावणार आहेत. तसेच, या दौऱ्यात निवडणुकांची रणनीती आखण्यावरही त्यांचा भर आहे. त्या दृष्टीने सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि पदाधिकाऱयांची अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोकसभा निवडणुकीत 45 जागा महाराष्ट्रातून निवडून आणण्याबाबतच्या रणनीतीविषयी चर्चा केली. त्याचबरोबर मुंबई पालिकेच्या निवडणुकांविषयीही चर्चा झाल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.