विधानभवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे भिडले; प्रचंड राडा

0

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मागील 4 दिवस वादळी ठरल्याने आज विरोधक शेतकऱ्यांचरूा मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेत मंगळवारी शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. यावरुन काल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. तर मुंबईतील खड्डे ट्राफिकचा प्रश्नावर चांगलेच वातावरण तापले होते.यासर्व गोष्ट्रींच्या पाश्वभूमीवर अधिवेशपाचे दोनच दिवस उरल्याने आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोले लगावले होते. यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावलं. दुष्काळावरुन सुरु झालेली चर्चा सभागृहातून वॉकआऊटपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. तर ओला दुष्काळ का जाहीर केला नाही म्हणून अजित पवारांनी सभात्याग केला.

 

विधानभवन पायरीवर विरोधक घोषणाबाजी करत होते. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे तिथे आले. दरम्यान अमोल मिटकरी आणि शिंदे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाले. त्यानंतर प्रकरण चिघळत गेले. नंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.