अमरावती पदवीधर मतदान : मतमोजणी वरून राजकीय नाट्य, धीरज लिंगाडे यांची आघाडी
दुसरा दिवस उजाडला तरी निकाल नाही
अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नाही. अवैध मतांच्या मोजणीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पुढे आहेत. त्यामुळे अमरावतीत मतमोजणीवरुन राजकीय नाट्य सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत आहे. काल दुपारी धीरज लिंगाडे हे 2 हजार मतांनी आघाडीवर होते. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. सध्या पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी सुरू आहे. त्यामुळे या मतमोजणीत कुणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अमरावतीमध्ये एकूण मतमोजणीमध्ये 8 हजार 735 मते अवैध ठरली असून, महत्वाची बाब म्हणजे जवळपास 4 हजारांच्यावर मतदारांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या नावापुढे केवळ 2 हा क्रमांक लिहून मतदान केले. या चार हजार अवैध मतांचा फटका मात्र भाजप उमेदवार रणजित पाटील यांना बसला आहे. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती.