बँक लॉकरमध्ये सापडले 500 कोटी रुपयांचे प्राचीनकालीन शिवलिंग

0

तंजावर : तामिळनाडू एका बँक लॉकरमधून प्राचीनकालीन शिवलिंग मिळाले आहे. जप्‍त केलेल्या शिवलिंगची किंमत तब्बल 500 कोटी रुपये आहे. शिवलिंगाची उंची 8 सेंटिमीटर असून, वजन 530 ग्रॅम आहे.


गुप्‍त माहितीच्या आधारे गुरुवारी एका बँक लॉकरमधून पोलिसांनी हे शिवलिंग ताब्यात घेतले होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचेअतिरिक्‍त पोलिस महासंचालक के. जयंत मुरली यांनी रविवारी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ज्याच्या नावे लॉकर आहे, त्या व्यक्‍तीकडे शिवलिंग कोठून कसे उपलब्ध झाले, याचा शोध आम्ही घेत आहोत.

तंजावरमधील एका व्यावसायिकाच्या घरात अनेक प्राचीन मूर्ती असल्याची गुप्‍त माहिती पोलिसांनाप्राप्‍त झाली होती. त्याआधारे या घराचा मालक एन. एस. अरुण यांची चौकशी पोलिसांनी केली. अरुणयांच्या वडिलांच्या लॉकर्सचीही झाडाझडती झाली. ‘माझे वडील . समियप्पन (80) यांनी हे शिवलिंगलॉकरमध्ये केव्हा आणि कसे ठेवले, त्याची मला काहीएक माहिती नाही, असे अरुण यांनी पोलिसांनासांगितले.

2016 मध्ये नागपट्टीणम् जिल्ह्यातील थिरुकुवलाई येथील शिव मंदिरातून चोरीला गेलेले हे शिवलिंग तर नाही ना, याचा तपास पोलिसकरत आहेत. शिवाय, आदिशंकराचार्यांच्या अलुवा या जन्मस्थळातून 2009 पासून चोरीला गेलेले पाचूचे शिवलिंगही हेच तर नाही ना, हेही तपासून पाहिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.