पिंपरी : शाहूनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उदघाटन प्रसंगी सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली असून या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाहूनगर परिसरात महापालिकेने 14 कोटी खर्च करुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान तयार केले आहे. या उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. आज संध्याकाळी या उद्यानाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या उदघाटन सोहळ्यास काही वेळ शिल्लक असतांना या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.