नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षात मार्चमध्ये येणे अपेक्षित आहे. लोक सुद्धा एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधीकडे लक्ष ठेवून आहेत. आज आम्ही एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याच्या काही सोप्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही एलआयसीच्या आयपीओमध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकता.
मीडिया रिपोर्टनुसार, सरकार एलआयसीचा आयपीओ यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. यासाठी, एलआयसीच्या कर्मचार्यांसह, आयपीओमध्ये पॉलिसीधारकांसाठी एक विशिष्ट कोटा ठेवण्यात आला आहे, जो 10% पर्यंत असू शकतो.
एलआयसीच्या आयपीओमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी, पॉलिसीधारकांना प्रथम त्यांची एलआयसी पॉलिसी पॅन कार्डशी लिंक करावी लागेल. यासोबतच तुमच्याकडे डिमॅट खाते असणे खूप आवश्यक आहे. जर तुमचे डिमॅट खाते असेल तर तुम्ही एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तुमची पॉलिसी पॅन कार्डशी लिंक करू शकता.
तुम्ही तुमची एलआयसी पॉलिसी आधीच पॅन कार्डशी लिंक केली असेल, तर एलआयसीच्या साइटला भेट देऊन तपासण्यास विसरू नका. हा देशातील सर्वात मोठा IPO असेल. एलआयसी फक्त देशातीलच नाही तर जगातील 10 सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. एलआयसीचा मार्चमध्ये येणारा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सरकार एलआयसीच्या आयपीओच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. ज्यासाठी सरकार एलआयसीची 10 टक्के हिस्सेदारी विकू शकते. या दृष्टीकोनातून पाहिल्यास, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आलेल्या पेटीएमच्या 18300 कोटींच्या तुलनेत हा आयपीओ पाचपट जास्त असेल.