नवी दिल्ली : इंग्लंड महिला संघांविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने जबरदस्त कामगिरी केली. यानंतर एक महिला खेळाडू चर्चेत आली आहे. सिनेसृष्टीतल्या एखाद्या अभिनेत्रींनालाही मागे टाकेल एवढी ती सुंदर आहे. या महिला खेळाडूच नाव आहे हारलीन देओल.
हारलीनचा जन्म २१ जून १९९८ रोजी पंजाबमधल्या चंडीगड येथे झाला. हारलीनला क्रिकेटची आवड अगदी लहानपणा पासूनच होती. तिने ८ वर्षाची असतानाच आपल्या भावासोबत आणि आजूबाजूच्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी ९ वर्षाची असतानाच ती शाळेच्या संघात निवडली गेली. १३ वर्षाची असताना ती हिमाचल प्रदेशला क्रिकेट खेळण्यासाठी गेली.
हारलीन लहान असताना हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल यांसारख्या खेळातसुद्धा भाग घेत असे. ती एक परिपूर्ण खेळाडू आहे. हारलीनला जेव्हा गल्ली क्रिकेटमध्ये मोठ्या मुलांसोबत क्रिकेट खेळत असे, तेव्हा तिच्या आजूबाजूची लोकं तिची तिच्या आईला जाऊन तक्रार करत असत.