महिलांचे दागिने हिसकावणारा सराईत जेरबंद; दोन सराफ आणि मध्यस्थीला केली अटक

गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी

0

पिंपरी : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरीचिंचवडच्या गुन्हे शाखा युनिटचारने बेड्या ठोकल्या आहेतआरोपींकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यातआले

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसारया गुन्ह्यामध्ये आनंद लोहारमध्यस्ती अक्षय अशोक मुरकुटेगणपतजवाहरलाल शर्मा (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्सआणि दर्शन रमेश पारीख (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्सयांना अटक करण्यात आलीआहे.

पिंपरी– चिंचवड शहरातील सांगवी आणि कासारवाडी भागात सोनसाखळी हिसकावणाऱ्या आरोपींवर भोसरी आणि सांगवी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतादोन्ही घटनांमध्ये एकाच पद्धतीने सोनसाखळी हिसकावण्यात आली होतीमॉर्निंगवॉकसाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष करून हे चोरटे सोनसाखळी हिसकावत असायचे

80 सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखा युनिटने कारवाई करत आरोपी आनंद सुनील साळुंखेउर्फ लोहार याला खडकी परिसरातून अटक केलीत्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पाहिजे आरोपी महादेव उर्फ अजय गौतमथोरात यासह महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकल चोरी करून सोनसाखळी हिसकावल्याचं तपासात निष्पन्न झाल.

आरोपी आनंद हा चोरीचे दागिने अक्षय अशोक मुरकुटे याच्यामार्फत ज्वेलर्स गणपत जवाहरलाल शर्मा आणि दर्शन रमेश पारेख यांनाविकत असल्याचे पोलीस तपासात पुढे आलं आहेया गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहेअशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्नागोरे यांनी दिली आहेआरोपींकडून साडेपंचवीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

हि कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेसह पोलीस आयुक्त संजय शिंदेअप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशीउपायुक्तस्वप्ना गोरेसहायक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष पाटीलसहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबरउपनिरीक्षक रायकरअंमलदार गवारीडोरजे आणि त्यांच्या पथकाने केली

Leave A Reply

Your email address will not be published.