‘ऑनलाईन टास्क’च्या आमिषाने 200 कोटींची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

९५ बनावट बॅंक खाते उघडून देशातील 3 हजार कोटी नागरिकांना ओढले जाळ्यात

0

पिंपरी : वेगवेगळ्या प्रकारचा ऑनलाईन टास्क देऊन देशभरातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याटोळीचा पिंपरी चिंचवड चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहेपोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून फक्तगुन्हे उघडकीस आणेल नाही तर पहिल्यांदाच ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील तब्बल १४ आरोपी जेरबंद केले आहेया कारवाईनेशहरातील १७ ऑनलाईन टास्क फ्रॉडचे गुन्हे उघकीस आले आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसारचिंतन शशिकांत फडके (३५रामध्यप्रदेश), ब्रजराज रामरतन वैष्णव (१८राराजस्थान), सुंदरदास चेदनदास सिंधी (२४राराजस्थान), राजेश भगवानदार करमानी (२६राराजस्थान), मोहम्मद रशिद चांदमोहम्मद (४७राराजस्थान), अभिषेक सत्यनारायण पाराशर (२४राराजस्थान), आशिष प्रल्हादराय जाजू (३५राकोंढवा), मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद (२४राअजमेर), नवीनकुमार नेवंदराम आसनाणी (४० राराजस्थान ), विकास सत्यनारायण पारिख(२९राराजस्थान), सुरेश गोवर्धनदास सिंधी (३२राराजस्थान), गौरव महाविर सेन (३१राराजस्थान), ललित नवरतन मल पारिख(३३राराजस्थान), मनिष ऋषिकेश वैष्णव (३३राराजस्थानअसे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हिंजवडी पोलिस ठाण्यात एका महिलेने ऑनलाईन टास्क फ्रॉडद्वारे तिची ७१ लाख८२ हजार ५२० रुपयांची आर्थिक फसवणूकझाल्याची फिर्याद दिली होतीहा गुन्हा गंभीर आणि तांत्रिक स्वरुपाचा असल्याने या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चारकडे देण्यातआला होतायुनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर आवताडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याचा तपास सुरुकेलायामध्ये आरोपींनी ऑनलाईन फ्रॉडसाठी वेगळीच पद्धत वापरल्याचे त्यांच्या लक्षात आलेया गुन्ह्याचा खोलात जाऊन तपासकरत तसेच आरोपींची गुन्ह्याची पद्धत समाजावून घेत पोलिसांनी आरोपींची ओळख पटविलीत्यानुसार मध्यप्रदेशबिहारराजस्थान याराज्यांमध्ये जाऊन १४ आरोपींना जेरबंद केले.

या कारवाईनंतर ऑनालाईन टास्क फ्रॉडचे १७ गुन्हे उघडकीस आले आहेततसेच हे गुन्हे करण्यासाठी आरोपींनी ९५ बनावट बॅंक खातेउघल्याचेही समोर आले आहेहिंजवडीवाकडचिंचवड पिंपरीआळंदीचिखलीअवधुतवाडीपुर्व विभाग सायबर पोलिसदक्षिणविभाग सायबर पोलिससायबर क्राईम पोलिस ठाणेसेंट्रल सायबर पोलिस ठाणे बेंगलोरसायबर क्राईम पोलिस ठाणे आगरासायबरक्राईम पोलिस ठाणे हावडा या पोलिस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत.

हि कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेसह पोलीस आयुक्त संजय शिंदेअप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशीउपायुक्तस्वप्ना गोरेसहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गसर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडेसहायक निरीक्षक अमरीशदेशमुखसिद्धनाथ बाबरउपनिरीक्षक रायकर आणि त्यांच्या पथकाने केली

 

अशी होती फसवणूकीची पद्धत ….

आरोपी टोळी तीन पातळ्यांवर काम करत होतीपहिल्या पातळीवर एखाद्या सर्वसामान्य माणसाला पैशाचे आमिष दाखवून त्याचेआधारकार्डफोटोमोबाईल नंबरबॅंक अकाऊंट वापरण्यासाठी घ्यायचेत्याच्या नावाने एखाद्या शहरात गाळा भाड्याने घेऊन फर्म सुरुकरत होतेदुसऱ्या पातळीवर ऑनलाईन टास्क फ्रॉड करण्यासाठी ऑनलाईन ग्राहक शोधण्याचे काम केले जात होतेयामध्ये संबंधितनागरिकांना मेसेज करून जास्त उत्पन्नाचे अमिष दाखविण्याचे काम केले जात होतेतिसऱ्या पातळीवर आर्थिक फसवणूक करतपैशांची फेरफार केली जात असे.

 

महिलेची अशी झाली फसवणूक

फिर्यादी महिलेला मोबाईलवर पार्ट टाईम जॉब करून पैसे मिळविण्यासंदर्भात मेसेज मिळालात्यानंतर संबंधित महिलेला वेगवेगळ्याहॉटेल्स  रेस्टॉरंटला रिव्हू  रेटींग देण्याचे काम असल्याचे सांगण्यात आलेया कामासाठी त्यांच्या अकाऊंटवर मोठी रक्कम जमाझाल्याचे सांगण्यात आलेमहिलेने सुरुवातीला एक दोन वेळा काही रक्कम अकाऊंटवरून काढलीमात्रनंतर अकाऊंट लॉक झालेआहेपैसे गुंतवावे लागतील असे सांगत महिलेची 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

 

एकूण २०० कोटींची फसवणूक

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी तब्बल ९५ बनावट बॅंक खाते उघडले होतेया बॅंक खात्यांमधून तब्बल २०० कोटींचे व्यवहारझाल्याचे उघकीस आले आहेयामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील फसवणूक झालेल्या नागरिकांची तब्बल साडेतीन कोटींची रक्कमआहेही खाती पोलिसांनी गोठविली असून तपास सुरु करण्यात आला आहेतपासानंतर संबंधित नागरिकांना पैसे परत देण्याचीप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

 

या टोळीने बँकेत खाते उघडण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने आलिशान कार्यालये उभा केलीत्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनीविश्वास ठेवत बँक खाती उघडलीमात्र एवढी मोठे व्यवहार या खात्यावरून होत असताना याकडे बँकेचे दुलर्क्ष झालेविशेष म्हणजे 95 खात्यापेकी एक हि खाते नॅशनल बँकेत नाही.

 

ऑनलाईन टास्क फ्रॉडमध्ये पकडण्यात आलेले आरोपी सुशिक्षीत तसेच सायबर ज्ञान असणारे आहेतत्यांनी आयटी तसेच सुशिक्षीतनागरिकांनाच आपले लक्ष बनविले आहेनागरिकांनीही ऑनलाईन फसवणुकीबाबत जागरुक राहणे गरजेचे आहेअज्ञात मोबाईलक्रमांकावरून येणारे मेसेजफोन याला रिप्लाय करू नयेतसेच कोणालाही आपली वैयक्तीक माहिती शेअर करू नयेआर्थिकगुंतवणुकीबाबत फोन कॉल येत असल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना कळवावे.

– स्वप्ना गोरेपोलिस उपायुक्त

Leave A Reply

Your email address will not be published.