नवी दिल्ली ः दिवसेंदिवस चिघळत जाणार शेतकरी आंदोलन आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा झालेली वाढ यामुळे काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. ”अन्नदाता के साथ अन्नपूर्णापर भी वार और कितना करोगे देश लाचार”, अशा आशयाचे ट्विट करत राहूल गांधींनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे.
देशातील सर्वात मोठी तेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत १४.२ किलोचे विनासबसिडीचे सिलिंडर ६४४ रुपये झाले आहे. तसेच कोलकात्यात ६७०.५० रुपये तर, चेन्नईत ६६० रुपये झालेली आहे. त्यामुळे राहूल गांधी मोदी सरकारविरोधात ट्विटदेखील केले आहे.
घरगुती वापरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे ती अशी ः १४.२ किलोचा सिलिंडर ५० रुपयांनी, ५ किलोचा लहान सिलिंडर १८ रुपयांनी आणि १९ किलोचा मोठा सिलिंडर ३६.५० रुपयांनी महाग झालेला आहे. म्हणजेज मागील १५ दिवसांमध्ये दोन वेळा १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.