आंद्रा धरण भरले; 1462 क्युसेक्सने धरणातून विसर्ग सुरू

0

पुणे : लोणावळा, मावळ परिसरात दहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे मावळातील नाणे आणि आंदर मावळाला पाणी पुरवठा करणारे आंद्रा धरण 100% टक्के भरले आहे. यानंतर धरणातून 1462 क्युसेक्सने इंद्रायणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

आज आंद्रा धरणाचे जलपूजन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेतकऱ्यांसह केले. तसेच लवकरात लवकर पवना धरण भरून मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटू हे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांच सरकार येताच वरुणराजाने कृपादृष्टी दाखवून राज्यभर पाऊस सुरू केला आहे, असाच पाऊस पडून बळीराजाचे राज्य येणारच अशा भावना व्यक्त करत हे राज्यातील पहिलंच जलपूजन असल्याचं माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केलंय. दरम्यान आंद्रा धरण भरल्यामुळे मावळातील शेतकरीही आनंदात दिसत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.