सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा महापालिका प्रशासनाविरोधात संताप

0

पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व प्रशासनाला माणुसकी नाही. त्याचेच एक उदाहरण आज शहरात दिसले. आयुक्त व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर तीव्र आंदोलन छेडले. आयुक्त राजेश पाटील यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.

या वेळी मृत कामगारांच्या नातेवाईकांनी आंदोलनस्थळी प्रेत आणले. या वेळी सर्वत्र तणावाचे वातावरण होते. पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली.  संबधीत प्रकरणावर न्याय देण्याचे आश्वासन देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर मृत महिला कामगारांचा अंत्यविधी करण्यात आले.

बाबा कांबळे म्हणाले की, महापालिका आयुक्त यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करावे. हिरामण यादव यांच्या मृत्यूप्रकरणी महापालिका आयुक्त तसेच सफाई ठेकेदार यांच्यावर ॲट्रॉसिटी तसेच प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा.
मयत हिरामण यादव यांच्या कुटुंबातील वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात यावे. हिरामण यादव यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपये अनुदान देण्यात यावे.

या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मयत महिला कर्मचाऱ्याचा अंत्यविधी करण्यात आला. तसेच महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.