अनिल देशमुखांना आणखी त्रास देता येतो का याचे प्रयत्न सुरु

0

पुणे : अनिल देशमुखांवरील ईडीचे छापे या गोष्टी काही नवीन नाहीत. याबाबत अधिक चिंता वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला यापूर्वी देखील केंद्रीय यंत्रणेद्वारे त्रास दिला गेला आहे. आणखी कुठे त्रास देता येईल का? असे प्रयत्न सुरू आहेत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे .

शरद पवार म्हणाले की, सार्वजनिक जीवनातल्या एखाद्या राजकीय नेत्याबाबत दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने ठराव करण्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते. चंद्रकांत पाटील हे कर्तृत्वावान गृहस्थ आहेत. आम्हाला यात काही आश्चर्य वाटत नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, असं पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, हे आता नवीन नाही महाराष्ट्र आणि इतर राज्यात सुरू केले आहे. केंद्रात हे सरकार आल्यापासून असे हे पाहायला मिळत आहे. मला काही चिंता वाटत नाही. लोकही त्याला गांभीर्याने घेत नाहीत, असं ते म्हणाले. प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या बैठकांबाबत ते म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या बैठकीबाबत गैरसमज मीडियातून आला. प्रशांत किशोर यांच्यांसोबत दिल्लीतील बैठक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाली.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा याची काळजी केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावी. केंद्राने यासाठी पुढाकार घ्यावा, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.