अनिल कपूरने दिली टायगर आणि दिशाच्या नात्याबद्दल हिंट

0

मुंबई : टायगर श्रॉफ आणि जाह्नवी कपूर यांच्यातील नात्याविषयीच्या बातम्या वारंवार येतात, पण त्यांच्यासबंधी अजनूही काही पुष्टी झाली नाही. मात्र, आता ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी या दोघांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहुणे म्हणून आलेल्या अनिल कपूरने दोघांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. वास्तविक कपिल शर्माने त्याला विचारले की, तुम्हाला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याचा फिटनेससाठीचा आहार चोरायला आवडेल? यावर अनिल कपूर यांनी उत्तर दिले की, “मला सर्वात फिट असणारा टायगरचा फिटनेस  आहार चोरायचा आहे. पण मी त्याच्याबरोबर काम केले नाही. पण त्याची ती दिशा पाटनी आहे ना तिचा मी आहार जरूर चोरला आहे.”

टायगर आणि दिशा पाटनी नुकतेच मालदीवमधून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर परतले आहेत. दोघेही मालदीवमध्ये एकत्र गेले होते आणि परत आले आहेत, पण दोघांनीही त्यांचा कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.

भारत चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत दिशा पाटनी म्हणाली, “मी बर्‍याच वर्षांपासून टायगरला इप्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता मी भारत चित्रपट केला आहे आणि त्यामध्ये मीदेखील खूप चांगले स्टंट केले आहेत. त्याच्याने तो इम्प्रेस होईल अशी आशा आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.