मुंबई ः अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ३६ वाढदिवस साजरा करत आहे. अंकिताने यंदाच्या वाढदिवसादिवशी आपल्या जवळच्या मित्रांना बोलविले होते. या पार्टीमध्ये संदीप सिंहदेखील होता, असा दावा केला जात आहे. त्यानंतर अंकिताला नेटकऱ्यांनी चांगलीच ट्रोल केली आहे. सुशांत सिंह राजपूतचे चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सुशांत सिंहच्या फेसबुक पेजवर अंकिताच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
