राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने बेड्स अन् इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे
मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. अशातच शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांची कोविड-19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी ब्रीचकँडी हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.