शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर? 

0

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई नंतर शिवसेनेच्या आणखी एक मोठा नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

टॉप्स एजन्सी प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर गेल्या आठवड्यात ईडीनं धाडी टाकल्या. त्यांचे पुत्र विहंग यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदेखील केली. त्यानंतर आतापर्यंत ईडीनं आतापर्यंत तीनवेळा विहंग यांना समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्रकरणात प्रताप सरनाईक यांचीदेखील चौकशी होणार आहे. मात्र परदेशातून आल्यानं ते सध्या क्वारंटाईन आहेत.प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या गैरव्यवहारातील नफ्यात ५०% वाटा? यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याचं समजतं. या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची ईडीकडून मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात चौकशी होऊ शकते. अशी चौकशी झाल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.