माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

0
मुंबई : 100 कोटी वसुली, लेटरबॉम्ब यामुळे चांगलेच चर्चेत आलेले मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सिंग यांनी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34 ,120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांचीही नावे आहेत. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना मनारे हे त्यावेळी ठाण्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी होते.
याआधी, परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कालच गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.