
राज अवधूत शर्मा (18, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी शुभम तानाजी कदम यांनी सोमवारी (दि. 2) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शर्मा यांने कोयता तोंडात पकडलेला फोटो सोशल मीडियावर टाकला होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सोमवारी (दि. 2) रात्री सात वाजताच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड परिसरातून अटक केली आहे.