महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एक मंत्री अडचणीत

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात आरोपाचे सत्र सुरूच आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. नाशिकमध्ये निलंबित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ही तक्रार पूर्णतः निराधार व खोटी असल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.

नाशिकमधील पंचवटी पोलिसात अनिल परब यांच्याविरोधात गजेंद्र पाटील यांनी तक्रार केली आहे. पदोन्नतीमध्ये गैरव्यहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे क्राईम ब्रांचला दिले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकापाठोपाठ ट्वीट करत आपल्यावर झालेल्या आरोप खोडून काढले आहे. ‘निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसंच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, अशी टीका परब यांनी केली.

‘मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे, ‘या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल’, असंही परब म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.