आणखी एका पोलीस निरीक्षकास केलं कंट्रोलशी संलग्न

0

पुणे : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात कुठेही अवैध धंद्ये चालु देऊ नका. तसे आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल असं यापुर्वीच बैठकीत स्पष्ट केलं आहे. शहरातील अवैध धंद्यांचं समुळ उच्चाटन करण्यासाठी आयुक्तांनी नामी युक्ती शोधली आहे. दरम्यान, मंगळवारी मुंढवा पोलिस ठाण्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी मुंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षकांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केलं आहे.

मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिमनगर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळताना 4 लोक आढळून आली. त्यांच्याकडून सुमारे 4000 रूपये जप्त करण्यात आले तर दुसरी कारवाई मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडीगांव येथील भाजी मार्केटमधील रिकाम्या गाळ्यामध्ये करण्यात आली. तेथे दोन लोक जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तेथून सुमारे एक हजार रूपये जप्त केले. शहरात कोठेही अवैध धंद्ये सुरू असलेले खपवुन घेतले जाणार नाही हे आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते. पोलिस आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी आणखी एका पोलिस निरीक्षकास शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 2 पोलिस निरीक्षकांना त्यांच्या हद्दीत अवैध धंद्ये सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अवैध धंद्ये बोकाळल्याचे दिसून येत आहे. खुलेआमपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.