पिंपरी : पिंपरी–चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुनावळे येथे छापा टाकत 44 लाख 42 हजार रुपयांचा गुटखाजप्त केला आहे. हि कारवाई रविवारी (दि.19) करण्यात आली असून एकाला याप्रकऱणी अटक केली आहे.
महेंद्र कुमार कान्हाराम परमार (25, रा. हिंजवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमंली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व मितेश यादव यांना बातमीमिळाली की, पुनावळे येथील स्मार्ट बाजारच्या मागे पत्राशेड मध्ये गुटख्याचा मोठा साठा करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनीसापळा रचून छापा टाकला असता पोलिसांनी परमार याला ताब्यात घेतले. यावेळी वेगवेगळ्या कंपनीचा 44 लाख 42 हजार 49 रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला.
हा जप्त माल कैलास राठोड व महेंद्र राठोड दोघे राहणार हिंजवडी यांचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार तीनहीआरोपींवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, सहायक पोलीसफौजदार बाळासाहेब सुर्यवंशी, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, पोलीस हवालदार संतोष दिघे, पोलीस हवालदार संदिप पाटील, आनंदबनसोडे, पोलीस नाईक मनोज राठोड, मयूर वाडकर, विजय दौंडकर, पोलीस शिपाई रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे यांनी केली आहे.