मुंबई ः बाॅलिवुडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार असल्यामुळे माध्यमांमध्ये बातमीचा विषय ठरलेली आहे. सद्या अनुष्का बेबी बंप फ्लान्ट करताना दिसत आहे. नुकताच तीने एका फोटो इन्स्टागामवर पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये ती शिर्षासन करत आहे. पती विराट कोहलीच्या मदतीने ती योगासने करत आहे.
अनुष्काने फोटो पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ”या व्यायाम प्रकारात हात खाली आणि पाय वरती करावे लागतात आणि ते सगळ्यात अवघड आहे. योगसेन माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहेत, त्यामुळे डाॅक्टरांनी सल्ला दिला आहे की, मी सर्व योगासने करावेत. त्यामुळे गरोदर राहण्यापूर्वी कित्येक वर्षे जी योगसाने मी करत होते. ते योगासने मी भिंतीच्या साह्याने करावेत, अशा विचारात असताना माझ्या पतीने योगासने करण्यासाठी मला मदत केली. हे सगळे योगाशिक्षकांच्या देखरेखीखाली सुरू आहे.”
अनुष्काचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. चाहत्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि काॅमेंट्स देत आहेत. अनुष्काने नेचफ्लिक्सवर ‘बुलबुल’ आणि अमेझाॅन प्राईमवर ‘पाताल’ या वेबसिरीज केल्या आहेत. अनुष्का शाहरुख खानसोबत २०१८ च्या ‘झिरो’ चित्रपटात शेवटची दिसली होती.