नवी दिल्ली : देशात कोरोना आकडेवारी जवळपास स्थिर आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 43 हजार 393 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 44 हजार 459 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गुरुवारी 911 लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 58 हजार 727 झाली आहे. आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 88 हजार 284 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
गुरुवारपेक्षा शुक्रवारी 2 हजार 499 कोरोना रुग्ण कमी नोंदले गेले आहेत. गुरुवारी 45 हजार 892 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. असे असले तरी मृतांमध्ये 94 ने वाढ झाली आहे. आतापर्यंत 42 कोटी 70 लाख 16 हजार 605 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गुरुवारी 17 लाख 90 हजार 708 रुग्णांची चाचणी करण्यात आली. आयसीएमआरने यासंदर्भातील माहिती दिली.
कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. आतापर्यंत 36 कोटी 48 लाख 47 हजार 549 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यातील 29 कोटी 58 लाख 89 हजार 870 लोकांना पहिला डोस मिळाला आहे, तर 6 कोटी 89 लाख 57 हजार 679 लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. गेल्या 24 तासांत 33 लाख 8 हजार लोकांना लस देण्यात आली.
India reports 43,393 new #COVID19 cases, 44,459 recoveries, and 911 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
Total cases: 3,07,52,950
Total recoveries: 2,98,88,284
Active cases: 4,58,727
Death toll: 4,05,939
Total vaccinated: 36,89,91,222 (40,23,173 in last 24 hrs) pic.twitter.com/mjo2HgtgZg
— ANI (@ANI) July 9, 2021