API सचिन वाझेने ईडीकडे केले अनेक खुलासे

0
मुंबई : मुंबई पोलीस दलातील अटकेत असलेला निलंबित API सचिन वाझेने ईडीकडे अनेक खुलासे केले आहेत. 100 कोटी वसुली प्रकरण आणि अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. तळोजा जेलमध्ये असलेल्या वाझेने ईडीला दिलेल्या माहिती दिली आहे.
वाझे हा स्फोटकांनी भरलेली गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. या प्रकरणात सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेच्या चौकशीसाठी ईडी कोर्टाची परवानगी घेतली होती. त्यानुसार ईडीला 10 ते 12 जुलै या काळात चौकशीसाठी परवानगी मिळाली.
याकाळात ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेची तळोजा जेलमध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी वाझेला अनेक मुद्यावर प्रश्न विचारण्यात आलेत. वाझेला माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या तक्रार अर्जाबाबत, परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचा केलेल्या आरोपाबाबत, काही बार मालकांनी सचिन वाझेला दिलेल्या पैशांबाबत प्रश्न विचारण्यात आले.
सचिन वाझेने आपण हे पैसे अनिल देशमुख यांचे पी ए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना दिल्याचं याआधी सांगितलं होतं. याबाबतही त्याला विचारण्यात आलं. या सगळ्या मुद्यांवर सचिन वाझेने सविस्तर उत्तरं दिली आहेत.
हे पैसे सचिन वाझे यांना देण्यात आल्याचं बार मालकांनी जबाब दिला आहे. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर एक यांना द्यायचे आहेत, असं सचिन वाझे सांगायचा. नंबर वन म्हणजे नक्की कोण याचा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. त्याचाही खुलासा सचिन वाझे याच्या जबाबात झाला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.