API सचिन वाझेंचे पोलिस खात्यातून निलंबन

0
मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दुसऱ्यांदा पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. नियमानुसार कुठल्याही गुन्ह्यात सेवेतील अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई झाल्यानंतर ही कारवाई केली जाते, त्यामुळे कारवाई केली असल्याचे समजते.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील “अँटिलिया’ निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. अंबानी यांना संदेशाद्वारे धमकीही देण्यात आली होती. कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. वाझे या प्रकरणात तपास करत होते. कार ज्या रात्री अंबानी यांच्या घराबाहेर उभी करण्यात आली, त्यावेळी एक व्यक्ती पीपीई किटमध्ये परिसरात फिरताना आढळून आली आहे. ही व्यक्ती कोण आहे, याबाबत एनआयएकडून तपास केला जात आहे.

मुकेश अंबानी यांच्या “अँटिलिया’ निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. एनआयए न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एनआयएकडून ही घटना घडल्यापासून वाझे यांच्या प्रत्येक हालचालींबाबत माहिती घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.