पुणे ः पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरू आहे. ”आमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. परंतु, आम्ही मार्केट सुरु ठेवण्याचं कारण की, जेणेकरून इतर राज्यांमधवी शेतमाल साठवता येईल आणि त्याची उद्या विक्री करता येईल”, असे प्रतिक्रिया व्यापारी सचिन पायगुडे यांनी दिली आहे.
मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.