पिंपरी : थेरगावच्या स्वयंघोषित क्वीन सोबत अश्लील भाषा वापरत व्हिडीओ बनवल्या प्रकरणी दोन तरुणींसह तिघांच्या विरोधातगुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी सुरुवातीला दोघी तरुणींना अटक केली. आता तिसरा आरोपी कुणाल कांबळेयालाही सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडीओमध्ये ‘हातात हातकडी घालून जेलला जाण्याची भाषावापरणारा कुणाल कांबळे पोलिसांना म्हणाला ‘असा व्हिडीओ परत काढणार नाही, सॉरी’.
साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव), साक्षी राकेश कश्यप (रा. चिंचवड) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर आता पोलिसांनीतिसरा आरोपी कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ) यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
इंस्टाग्रामवर Thergaon QueenN या नावाने अकाउंट चालवणारी मुलगी साक्षी श्रीश्रीमल हिने तिच्या सोबत असणारा मुलगा कुणालआणि साक्षी कश्यप यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरलेले आणि धमकीवजा व्हिडीओ बनवले. तेइंस्टाग्रामवर पोस्ट केले. यामुळे समाजातील मुलामुलींची नीतिभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपींची ही कृतीकारणीभूत ठेवल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 292, 294, 506, 34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याबाबत विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रियाउमटल्या. हा प्रकार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या निदर्शनास आला असता त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वयंघोषित क्वीन सह तिच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला दोघी तरुणींना अटक केली. त्यानंतर कुणाल कांबळे याला देखील अटक केली.
पोलिसांनी खाक्या दाखवताच कुणाल कांबळे नरमला. पोलिसांसमोर गयावया करून त्याने याप्रकरणी माफीनामा लिहून दिला. कुणालयाने एका व्हिडीओमध्ये ‘ एक वेळेस गोड बोलणारा मित्र तुम्हाला सोडून जाईल. पण हातात हातकडी घालून तुमच्या सोबत जेललाजाईल तो कधीच साथ सोडणार नाही’ अशी भाषा वापरली होती. पोलिसी खाक्या मिळताच कुणाल याने माफी मागत अशी चूक पुन्हाकरणार नाही. असे व्हिडीओ पुन्हा बनवणार नाही. सॉरी’ असे म्हटले आहे. याबाबत त्याने पोलिसांना माफीनामा देखील लिहून दिलाआहे.