मुंबई ः बोर्डाकडून (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) २०२१ आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहेत. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालामार्फत सरल डेटाबेसवरून १५ डिसेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२१ पर्यंत भरायचे आहेत.
त्याचबरोबर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार, तसेच काही विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते १८ जानेवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन भरायचे आहेत.
फाॅर्म क्रमांक १७ भरणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाईल. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीत १७ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नयेत, असंही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.