राज्यातील 14 उपविभागीय पोलीस अधिकारी /सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या

0

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पदावरून पदोन्नती मिळालेल्या 14  जणांची उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आज नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास आणखी एक सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाले आहेत.

22/02/2022 रोजी याबाबत आदेश जारी झाले आहेत. यामध्ये अजय सुभाष चांदखेडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर, नागपूर ग्रामीण), कवियत्री किसन गावित (सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे शहर), जितेंद्र आत्माराम आगरकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेशपुरी, ठाणे ग्रामीण), मिलिंद दासराव वाघमारे  (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई), मुकुंद बंकटराव अघाव (उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्नड उप विभाग, औरंगाबाद ग्रामीण), देविदास काशीनाथ शेळके (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, जालना), अनिल राजाराम दबडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड), अतुलकुमार यशवंतराव नवगिरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपूर, अमरावती ग्रामीण), दीपक सदाशिव चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई), अंगद ज्ञानोबा सुडके (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, लातूर), धनंजय रामचंद्र कंकाळे (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण), अजयकुमार छगनलाल मालविय (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) आणि उदय वसंतराव डुबल ( अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.