पुणे : महाराष्ट्र गुप्त वार्ता विभागातून पुणे शहर पोलीस दलात बदलून आलेले सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार वसंतराव पळसुले यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची वाहतूक शाखेतून गुन्हे शाखेतील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
पुणे शहरात बदलून आलेल्या सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी मनोहर गलंडे यांची वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागपूर शहर येथून पुण्यात बदली झालेले सहायक पोलीस आयुक्त व्यंकटेश देशपांडे यांची विशेष शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश काढले आहेत.
गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत बदली झाल्यापासून आर्थिक व सायबरचा अतिरिक्त कार्यभार सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्याकडे होता. मिलिंद पाटील हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे विशेष शाखेत व्यंकटेश देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
5 महिन्यानंतर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तपदी स्वतंत्र अधिकार्याची नेमणूक करण्यात आली आहे.