पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात निरीक्षकांच्या नियुक्त्या

वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यास तिसरा PI

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झालेल्या आणि अगोदरच्या दोन अश्या एकूण सात पोलीस निरीक्षकांच्या आज पोलीस आयुक्तांनी नियुक्त्या केल्या आहेत.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेत, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांची म्हाळुंगे चौकी (गुन्हे) येथे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांची चाकण पोलीस ठाणे (गुन्हे) तर पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांची पिंपरी (गुन्हे २) शाखा
पोलीस निरीक्षक सोन्याबापू देशमुख यांची देहूरोड पोलीस ठाणे (गुन्हे) येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांची वाहतूक विभाग ते वाकड पोलीस ठाणे ( गुन्हे- २) आणि मुख्यालयातील पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव – यांची दिघी- आळंदी वाहतूक विभाग येथे बदली करण्यात आलेली आहे. वाकड पोलीस आणि पिंपरी पोलीस ठाण्यात तिसऱ्या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.