स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द; प्रदीप जांभळे-पाटील यांची नियुक्ती

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द झाली आहे. त्यांच्याजागी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (गुरुवारी) काढले आहेत. दहा दिवसांतच झगडे यांची नियुक्ती रद्द झाली असून त्या उपायुक्त पदावर कार्यरत राहतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.