“एआय”चा योग्य वापर उद्योग क्षेत्रात आवश्यक – प्रभाकर साळुंके

सुमित ग्रुप आणि फॅक्टरीमाईंड यांचा करार संपन्न

0

पिंपरी : मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने ( एआय) लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. “एआय”चा योग्य वापर उद्योग क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडवू शकतो. मात्र अद्यापही अनेक उद्योगांना ” एआय” बद्दल पुरेशी माहिती नसल्याने असे उद्योग पिछाडीवर पडत असल्याचे मत सुमित ग्रुपचे सीईओ प्रभाकर साळुंके यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील सुमित ग्रुप आणि  फॅक्टरीमाईंड यांचा करार संपन्न झाला. यावेळी प्रभाकर साळुंके बोलत होते. कार्यक्रमाला संचालक अमित साळुंके, सुमित साळुंके हे उपस्थित होते.

यावेळी प्रभाकर साळुंके म्हणाले, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे  शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असणार आहे. कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे आणि भविष्यात तो अधिक पटीने वाढणार आहे. मात्र अद्यापही या तंत्रज्ञानाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने आपले उद्योग पिछाडीवर आहेत.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रणाली भविष्यात मोठी क्रांती घडविण्याची हमी देते असे सांगून प्रभाकर साळुंके म्हणाले, आपल्याकडील उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्चा उपयोग इंडस्ट्रीसाठी कसा आणि का करावा याचे ज्ञान नसल्याने आपल्या कंपन्या पिछाडीवर पडत आहेत.उत्पादन क्षेत्रातील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्याबाबत आजही सल्लागार,  प्लांट मॅनेजर, ऑपरेटर व कंपनीतील इंजिनिअर अनभिज्ञ आहेत. म्हणूनच कंपन्यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स वापरण्याची गरज आहे. कोणत्याही कंपनीत इंजिनिअर हे एआय तज्ज्ञ नसल्याने, त्यांना एक परवडणारे आणि सर्वसमावेशक असे टूलकिट देऊन त्यायोगे प्रयोग करून  ते कंपनीच्या प्रगतीसाठी चांगल्या संकल्पना विकसित करू शकतात.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा नक्की फायदा काय?

मानव त्याच्या डोक्यात किती गोष्टी ठेऊ शकतो याला बंधन आहे. तो एका वेळेस किती गोष्टी करू शकतो यालाही बंधन आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हे बंधन नसेल. भूतकाळात साठवलेली कोणतीही माहिती क्षणात या तंत्रज्ञानाने आपल्याला समजू शकते.  ‘कोव्हिड-१९’वर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक संभाव्य औषधे शोधून काढली. यात अर्थातच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला होता. हा एक  तंत्रज्ञानाचा मोठा फायदा म्हणून उदाहरण दाखल दाखवता येईल.

एआय प्रणालीचा उपयोग करून उत्पादन करणे म्हणजे भरमसाठ आर्थिक गुंतवणूक  किंवा नवीन मशिनरी खरेदी करणे असा अर्थ नसून आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ व मशिनरीचा कार्यक्षम वापर करणे हा आहे.आज करार करण्यात आलेल्या फॅक्टरीमाईंडने विकसित केलेली प्रणाली वापरून मेन्टेनन्स इंजिनिअर मशीनमधून डेटा गोळा करून मशीन लर्निंग मॉडेल्स तयार करू शकतात. याचा फायदा नक्कीच कंपनीला होणार आहे.

-प्रभाकर साळुंके
सीईओ, सुमित ग्रुप

Leave A Reply

Your email address will not be published.