लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांची टाटा मोटर्स प्लांटला भेट

0

पिंपरी : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पिंपरीतील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाला आज (शुक्रवारी, दि.06) भेट दिली. लष्करप्रमुख दक्षिण कमानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी टाटा मोटर्सच्या कारखान्याला भेट देऊन पॅसेंजर आणि कमर्शियल वाहनांच्या असेम्ब्ली लाईनची कार्यपद्धती जाणून घेतली. तसेच, अभियांत्रिकी संशोधन केंद्राला भेट दिली.

झेनॉन, एडब्लूडी (4×4) ट्रूप कॅरियर, लाईट बुलेट प्रूफ व्हेइकल व कॉम्बॅट सपोर्ट व्हेईकल्स, माइन प्रोटेक्टेड व्हेईकल्स आणि व्हील्ड आर्मर्ड ॲम्फिबियस प्लॅटफॉर्म एडब्लूडी (8×8) कॉन्फिगरेशनसह टाटा वाहनांची श्रेणी यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती.

आजच जनरल नरवणे यांनी तळेगाव येथील लार्सन अँड टुब्रोच्या स्ट्रॅटेजिक सिस्टीम कॉम्प्लेक्स (एसएससी) ला भेट देऊन त्यांच्या उत्पादन सुविधा आणि भारतीय सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्याच्या विकासाबाबत सुरू असलेल्या प्रयत्न यांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी संरक्षण संबंधी भारतीय लष्करासह एल अँड टी च्या सहभागाबद्दल लष्करप्रमुखांना माहिती देण्यात आली. लष्करप्रमुखांनी आत्मनिभर भारताला प्रोत्साहन देणा-या दोन्ही स्वदेशी उत्पादकांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

Army Chief General MM Naravane is on a two-day visit to Southern Command, touching base at Pune & Goa. During his Pune visit, he visited Tata Motors at Pimpri where he observed the operations of assembly lines of Passenger & Commercial Vehicles & Engineering Research Centre. pic.twitter.com/sMk2yPAjSC

— ANI (@ANI) August 6, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.