रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णासाठी बॅड मिळावे म्हणून या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरायला लागत आहे. ही परिस्थिती काहीशी कमी करण्यासाठी आता महानगरपालिका लष्कराची मदत घेणार आहे.लष्कराच्या रुग्णालयाचे बेड व व्हेंटिलेटर देण्यास सैन्याकडून ग्रीन सिग्नल दिला आहे. उद्यापर्यत लष्कराकडून मदत मिळणार असल्याचे पालिका आयुक्त यांनी सांगितले. सध्या पुण्यात 445 व्हेंटिलेटर असून सर्वांवर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूमुळे पुण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये कोविडची परिस्थिती बिकट झाली आहे.
पुण्यात पॉझिटिव्ह रेट ३२ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८ हजारांवर गेला आहे. कोरोना रुग्णांच्यासंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, आरोग्य सुविधा बळकट करणे, आँक्सिजन बेडस वाढवणं, बेड कमी पडले तर वेळप्रसंगी खाजगी आणि आर्मी चे बेड ताब्यात घेतले जातील, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
पुण्यातील सध्यस्थिती
– पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम
– पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती
– पुन्हा एकदा पुण्यात बेडची कमतरता जाणवणार
– जिल्ह्यात मृत्युदरही वाढण्याची शक्यता
एकूण बेड्सची स्थिती
– ऑक्सिजन बेड्स – 9118
– ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093
– आयसीयु बेड्स – 2927
– व्हेंटिलेटर्स बेड – 996
12 एप्रिल पर्यंतचा प्रशासकीय अनुमान
– ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील
– 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल
– 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील
– 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल
जिल्ह्याचा मृत्यूदर
– पुणे मनपा – 2 टक्के
– पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के
– पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के
– पुणे ग्रामीण – 1.9 टक्के
– पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8
लष्कराकडून ३३० बेड॒स उपलब्ध झाले आहेत. लष्कराचे रुग्णालय हे कोविड समर्पित रुग्णालय राहणार असून, ही सुविधा गुरुवारपासून उपलब्ध होणार आहे. याशिवाय प्रशासनाने दहा व्हेंटिलेटर खरेदीबाबत ऑर्डर दिली असून, परवापर्यंत ते ससून रुग्णालयास उपलब्ध होणार आहेत. सध्या ससून रुग्णालयात ८७ व्हेंटिलेटर बेड॒स आहेत. ही संख्या शंभर बेड॒सपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.
सौरभ राव, विभागीय आयुक्त