मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना अटक करा असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश वाधवान हा किरीट सोमय्या याचा भागीदार आहे. निकॉन इन्फ्रा या कंपनीमध्ये भागीदारी आहे.
सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराविषयी तीन वेळा ‘ईडी’कडे तक्रार केली आहे. मात्र त्यावर काहीच झाले नव्हते. उलट सोमय्या हा ईडीच्या कार्यालयात बसून असतो. वाधवान याच्या खात्यातुन भाजपला 20 कोटी पक्ष निधी गेला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा ज्या पध्द्तीने हल्ला करत आहेत यातून त्यांना राज्यातील सरकार पडायचे आहे. भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक भेटले. त्यांनी मला सांगितले या सरकार मधून तुम्ही बाहेर पडा. आम्हाला काही केल्या सरकार पडायचे आहे. एकतर राष्ट्रपती लागवट आणू किंवा आमदार फोडू, असे सांगितले. असे नाही केल्यास तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे अडकवू अशा धमक्या दिल्या आहेत. सध्या पवार कुटुंबावर धाडी पडत आहेत. त्यांनाही आम्ही टाईट करु अशा धमक्या देण्यात आल्या आहेत.
मी यास नाही म्हटले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्यावर आणि माझ्या जवळच्या लोकांवर ईडी च्या धाडी पडल्या. दरम्यान एक दलाल वेगवेगळ्या माहिती पसरवत होता. भाजपने राज्यात नालायकपणा सुरु केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमी धमक्या देतात. सरकार पडणार यासाठी वेगवेगळ्या तारखा देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात काय करतात? माझ्या
भाजपकडून मराठी माणसांवर हल्ला केला जात आहे. तुम्ही काय पाप केले नसेल, कोणाचे वाईट केले नसेल तर मग कुणाच्या बापाला घाबरु नका. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. मराठी माणूस बेनाम नाही, याला शिवसेना घाबरत नाही; असेही राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान शिवसेना भावना समोर मोठी गर्दी झाली आहे.
महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले होते. अनिल देशमुख बाहेर येथील आणि भाजपचे साडेतीन मंत्री त्या ठिकाणी असतील असे म्हटले होते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडून ईडी सारख्या संस्थेचा गैरवापर होत असल्याचा वारंवार आरोप केला. काही दिवसांपूर्वीच प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली.