पिंपरी : गणेशनगर, बोपखेल येथील सीएमईच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला बिस्कीट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून सीएमईच्या जंगलात तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. आरोपीला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि.14) दुपारी साडे बारा ते दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
कुलेश्वर गजाधर ठाकूर (25, रा. गणेशनगर, बोपखेल, मुळगाव हाजीरबाग, झारखंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 376, (2) (एम), 363, 366 अ, पोक्सो कायदा कलम 04, 05 (एम), 06, 08, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकूर याने अल्पवयीन मुलीला बिस्कीट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. गणेश नगर, बोपखेल येथील जंगलात घेऊन जात मुलीवर अत्याचार केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपी ताब्यात असून, दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.