राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांच्याशी जवळीक साधणारा आणि अनेकांची फसवणूक करणारा अटकेत
गुंडा विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : राज्यातील मोठे राजकीय नेते, पोलीस अधिकारी, कायदेतज्ज्ञ यांच्यासोबत घनिस्ट संबंध असल्याचे दाखवणाऱ्या फसवणुकीचया गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनी अटक।केली आहे. फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून 8 लोकांची 52 लाख रुपयांची फसवणूक केली होती. चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.
आरोपी महेश बापू लोंढे (42, रा. मुळगाव गुरव, पिंपरी ता. कर्जत जि. अहमदनगर) याला अटक केली आहे. लोंढे याने मिरॅकल 9, वडमुख वाडी पुणे या ठिकाणी फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून 08 लोकांकडून ₹ 52,73,434/- घेऊन फ्लॅट न देता घेतलेल्या रकमेचा अपहार केला. या प्रकरणी भोसरी MIDC व दिघी पोलीस स्टेशन येथे सन 2018 पासून एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी हा सुमारे 04 वर्षापासून राहण्याची ठिकाणे व मोबाईल नंबर बदलून स्वतःचे अस्तित्व लपवून रहात होता. लोंढे हा सेक्टर 6 मोशी प्राधिकरण पुणे येथे असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन दिघी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.