पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
लक्ष्मण हरिभाऊ जोरी (रा. गोर्हे बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. जोरी सध्या येरवडा कारागृहात असून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बिबवेवाडी पोलिसांनी केले आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत जाहीरात केली होती. 1 लाख गुंतवल्यास दिवसाला 2 ते 5 हजार रुपये नफा मिळवा, असे आमिष त्याने दाखवले होते. बिबवेवाडी भागातील एका तक्रारदाराची त्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता.
खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीसांनी आरोपी जोरी याला हवेली तालुक्यातील गोर्हे बुद्रुक येथे सापळा लावून अटक केली. त्या
च्याकडे कसून चौकशी केली असता त्याने राज्यातील अनेकांना शेकडोचा गंडा घातल्याचे कबूल केले.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर,
उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली आहे