महिलांना अश्लील व्हिडीओ पाठवणारा अटकेत

0

पिंपरी : दुकानात चॅर्जिगसाठी ठेवलेल्या मजूरांच्या मोबाईलच्या नंबरवरुन दुकानात आलेल्या महिलांचे नंबर घेऊन त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवून अश्लिल मेसेज करणार्‍याला वाकड पोलिसांनी अटक केली.

संपत राम (रा. चहाचे दुकान, रामदेव सुपर मार्केटजवळ, बाणेर, मुळ गाव जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाकड येथील एका महिलेला दोन वेगवेगळ्या व्हॉटसअॅप नंबरवरुन अश्लिल मेसेजेस व अश्लिल व्हिडिओ कॉलिंग करुन विनयभंग करण्यात आला होता.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी तपास पथकाला आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सुनिल टोणपे, सहायक निरीक्षक एस. एम. पाटील यांनी ज्या मोबाईलवरुन हे मेसेजेस आले होते. त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात हे फोन बाणेर येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्या मोबाईलधारकांकडे चौकशी केल्यावर त्यांच्या मोबाईलचा दुसर्‍याने वापर केल्याचे आढळून आले.

याने इतरही काही महिलांना अशा प्रकारे अश्लिल मेसेजेस व अश्लिल व्हिडिओ कॉल करुन त्रास दिला असण्याची शक्यता आहे. त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.