पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्योगनगरी पिंपरी–चिंचवड मध्ये रविवारी (दि. 11) सायंकाळी 4.55 वाजताआगमन झाले. आगमनासाठी महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांच्या तसेच संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्यास्वागत कक्षातून दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. शहरातील हजारो भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखीचाआजचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शनिवारी (दि. 10) देहू येथील शिळा मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पहिला मुक्काम देहूयेथील इनामदार वाड्यात झाला. त्यानंतर रविवारी सकाळी पालखी पुढे निघाली. सायंकाळी 4.55 वाजता निगडी येथे तिचे आगमनझाले. भक्ती शक्ती चौकामध्ये विसावा घेतल्यानंतर पालखी पुढे आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराकडे मुक्कामासाठी रवाना झाली.
निगडी भक्ती शक्ती चौकात आकर्षक रांगोळ्यांनी पालखीचे स्वागत करण्यात आले. महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कंपन्यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. दिंड्यांमधील वारकऱ्यांना विविध वस्तू आणिखाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.