अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या नजरकैदेत

0

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदत ठेवलेले आहे. केजरीवाल यांनी बुधवारी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. तेव्हापासून अरविंद केजरीवाल यांनी नजरकैदेत ठेवलेले आहे, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या ट्विटरवरून सांगण्यात आली आहे.

मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.