मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात असणारा साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचीभेट घेतली. रविवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेयांच्यापासून धोका असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
प्रभाकर साहिल यांनी प्रतिज्ञापत्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुंबई पोलीसप्रभाकर साईल यांच्याकडून आरोपांबद्दल माहिती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मुंबई पोलीस चौकशी सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र सरकार प्रभाकर साईल यांच्याआरोपांबद्दल पुढे काय कारवाई करते यावर सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चा सुरू झाली आहे.