होर्डिंग कोसळल्याने तब्बल 5 जण ठार ; देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथील घटना

0

पिंपरी : देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे सोमवारी (ता.17) सायंकाळी होर्डिंग कोसळल्याची दुदैवी घटना घडलीआहे. या होर्डिंग खाली तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी सायंकाळी पिंपरीचिंचवड शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर केवळयेथे रस्त्याच्या बाजूला लावलेले एक होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली सापडून 5 जणांचा मृत्यू झाला.

साडेपाच वाजताच्या सुमारास किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कटरच्या साह्याने होर्डिंग कट करून, तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीसनिरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिली.

सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळामध्ये शहरात अन्य ठिकाणी देखील होर्डिंग कोसळल्याची माहिती मिळत आहे. निगडी मधीलओटास्कीम येथे देखील वादळात होर्डिंग आणि सिग्नलचा खांब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.