पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरच्या प्रा. दिगंबर दुर्गाडे यांना तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित करण्यात आले होते. याच वेळी ही निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चर्चा करुन प्रा. दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे यांची नावं अंतिम केली. दिगंबर दुर्गाडे यांनी ‘ड’ वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांना पराभूत केले आहे. फराटे यांना अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
चांदोरे यांनी मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत विजय मिळवला आहे. चांदोरे यांना २८ मत मिळाली होती, तर कलाटे यांची गाडी १७ वरचं थांबली होती.