आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 11 जूनला प्रस्थान

0

पिंपरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाली आहे. त्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 11 जून रोजी आंळदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. आळंदी देवस्थान संस्थानाने हा कार्यक्रम जाहीर केला. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.

देहू देवस्थान संस्थानाने यापूर्वीच पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल, तर 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होईल.

आळंदी देवस्थान संस्थानने ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ज्ञानोबारायांची पालखी 11 जूनला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. ती 28 जून रोजी पंढरीत पोहचेल. ज्ञानेबांची 29 जून रोजी विठूरायांसोबत गळाभेट होईल. या सोहळ्याचे वारकऱ्यांना वेध लागलेत. त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जून रोजी तुकोबांची पालखी सहभागी होणार आहे आणि याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट होणार आहे. तर संत तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.