पहिल्या फेरी पासून आघाडीवर असणाऱ्या अश्विनी जगताप विजयाच्या दिशेने
तिसाव्या फेरी अखेर 28 हजार 529 मताधिक्य
पिंपरी : हायव्होल्टेज बनलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचा कल समोर येत आहे. सकाळी आठ वाजता मनमोजणी सुरूझाली. पहिल्या फेरी पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडीघेतली.
एकूण 37 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सायंकाळी चार वाजता 30 फेऱ्याची मतमोजणीत पूर्ण झाली असून यामध्येही अश्विनीजगताप या आघाडीवर आहेत. हि निवडणूक प्रत्येकाने प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकजण रींगणात उतरले होते.
महाविकास आघाडीकडून शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, नाना पटोले, भास्कर जाधव आदीस्टार प्रचारक उतरले होते. राष्ट्रवादीचे, महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी चांगली झुंज दिली आहे.
30 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 111913 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 83384 मते मिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 39405 मते मिळाली आहेत. जगताप यांना 28529 मतांची आघाडी मिळाली आहे.