सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून

0

पुणे : सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक निरीक्षकाच्या आईचा खून करण्यात आलेला आहे. ही घटना वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भाजीमंडई जवळ असलेल्या मैदानाशेजारी आज पहाटेच्या सुमारास घडली. पोलिस हवालदाराच्या खुनाची घटना ताजी असतानाच, ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

शाबाई अरुण शेलार (65, रा. रामनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आज सकाळी भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला हा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा पोलिस दलालीत सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या त्या आई होत्या.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाबाई यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्या दुकानातच वास्तव्य करत होत्या. सकाळी भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्याने त्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.